धडाका.. कानपिचक्या अन्‌ खडेबोल; अजितदादांच्या दौऱ्याची मतदारसंघात चर्चा I Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

आपण नेहमी चुकीचे वागणाऱ्यांना बोलतो. कुणालाही कसेही बोललो असतो.

धडाका.. कानपिचक्या अन्‌ खडेबोल; अजितदादांच्या दौऱ्याची मतदारसंघात चर्चा

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (सातारा) : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी येथील नगरपंचायत कार्यालयासाठी जुन्या तहसीलदार कार्यालयाची (Tehsildar Office) इमारत देण्याची हस्तांतरण प्रक्रिया व शहराला वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. काहींना राजकीय कानपिचक्याही दिल्या. पोलिस ठाण्याच्या (Police Station) नवीन इमारतीच्या कामाबाबत खडेबोलही सुनावले. अजितदादांच्या कामाचा धडाका... दिलेल्या कानपिचक्या अन्‌ सुनावलेले खडेबोल याची चर्चा होत आहे.

उपमुख्यमंत्री नुकतेच खटाव, माण तालुक्यांच्या दौऱ्यावर आले होते. श्री. पवार यांच्या हस्ते जम्बो कोविड सेंटर व पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीने उद्‌घाटन झाले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाची इमारत नगरपंचायतीला देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केली. शहराचा वाढीव पाणीपुरवठा योजनेच्‍या प्रस्तावला तातडीने मंजुरी दिली जाईल. जिल्ह्यासाठी आरोग्य विभागास वाढीव दहा कोटी व पोलिसांना पायाभूत सुविधेसाठी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात येईल आदी आश्‍वासनेही त्यांनी दिली. यानिमित्ताने उपमुख्यमंत्र्यांच्या कामाचा धडाका दिसून आला. आता आपण स्वत: सातारा, कोरेगाव, खटाव, माणकडे लक्ष देणार आहे, असे सांगत त्यांनी काहींना कानपिचक्याही दिल्या.

हेही वाचा: जरंडेश्वर कारखाना घोटाळ्यात अजित पवारांचा हात

येथील पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमात अजितदादांनी इमारतीच्या पायऱ्यांपासून ते एकूण कामाचा दर्जा व खर्चाबाबत जाहीर ऑडिटच केले. सहा हजार चौरस फुटांच्या बांधकामाला तीन कोटी रुपयांचा खर्च म्हणजे पाच हजार रुपये प्रति चौरस फूट असा बांधकाम व फर्निचरचा खर्च आला. या इमारतीच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित करताना त्यांनी आवारातील जमिनीचे सपाटीकरणही चांगले झाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. हे बरोबर नाही, हा सरकारचा पैसा आहे. चांगल्या पद्धतीने खर्च करा. इमारतीच्या कामाचा खर्च निश्चीत जास्त झाला असून बांधकाम विभागाने त्याची नोंद घ्यावी, असे थेट खडेबोलच त्यांनी सर्वांसमोर सुनावले.

हेही वाचा: शरद पवारांचं नाव घेऊन उभी हयात सत्तेचं केंद्रीकरण केलं

आपण नेहमी चुकीचे वागणाऱ्यांना बोलतो. कुणालाही कसेही बोललो असतो, तर बारामतीकरांनी ३० वर्षे निवडून दिले नसते. जिल्ह्यातील काही लोकांना तुपात घोळले, साखरेत घोळले तरी ते चुकीचेच वागतात.

-अजित पवार, उपमुख्यमंत्री

loading image
go to top