Gail Omvdet : महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी : अजित पवार

Gail Omvedt
Gail Omvedtesakal
Updated on

कऱ्हाड (सातारा) : आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संशोधक, अभ्यासक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट (Gail Omvedt) तथा शलाका भारत पाटणकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दुःख व्यक्त केले. भारतीय समाज, आदिवासी जीवनपध्दती, लोकजीवन, भारतीय मौखिक परंपरा, संत साहित्य यांचा गाढा अभ्यास असणाऱ्या ज्येष्ठ विचारवंत, समाजशास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलीय.

Summary

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, ज्येष्ठ विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट या संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक होत्या. ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी त्यांनी विशेष कार्य केले. तथागत गौतम बुद्धांनी मांडलेल्या मानवतावादाच्या सिद्धांतासह महात्मा ज्योतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान त्यांच्या सामर्थ्यासह त्यांनी आपल्या साहित्यातून नव्याने मांडले. क्रांतीवीर बाबूजी पाटणकर, क्रांतिवीरांगणा इंदुमती पाटणकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून त्यांनी डॉ. भारत पाटणकर यांना आयुष्यभर समर्थपणे साथ दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

Gail Omvedt
ज्येष्ठ संशोधक, लेखिका डॉ. गेल ऑम्व्हेट यांचे निधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com