साताऱ्याच्या हद्दवाढीस अजित पवारांचाच हात; आता हवे महापालिकेचे लक्ष

प्रवीण जाधव
Wednesday, 9 September 2020

पालिकेच्या हद्दवाढीच्या निर्णयाला 40 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. हे पूर्वानुभव गाठीशी असल्याने साताऱ्याची महापालिका होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पावले उचलली पाहिजेत.
 

सातारा : कास धरण उंची वाढविणे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्‍नांबरोबर सातारा शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हद्दवाढीला अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाच हात लागला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी साताऱ्याच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असल्याचे दाखवून दिले.
सातारच्या हद्दवाढीबाबत उदयनराजेंची ही भावना
 
सातारा पालिकेची स्थापना 1851 मध्ये झाली. 1882 मध्ये गोडोली, सदरबझार व कॅम्प परिसरासाठी लहान नगरपालिकेची (सब अर्बन म्युन्सिपल) स्थापना झाली. 1968 मध्ये पालिकेची प्रथम हद्दवाढ होऊन त्यामध्ये हा भाग समाविष्ट झाला. त्यानंतर 1979 मध्ये नव्याने हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामध्ये सातत्याने बदल होऊन अनेकदा त्याबाबतचे प्रस्ताव पाठविणे, हरकती घेणे, अधिसूचना काढणे आदी "लालफिती'चा कारभार सुरू होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या तोंडावर तर प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा केली होती; परंतु काही झाले नाही. अखेरीस उपमुख्यमंत्री पवार हेच साताऱ्याच्या विकासासाठी धावून आले. शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी साताऱ्याच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असल्याचे दाखवून दिले.

मदन भोसलेंच्या घरासमोर 'स्वाभिमानी' चा ठिय्या 

कृष्णाच्या माध्यमातून वाठारला 70 बेडचे सेंटर : डॉ. सुरेश भोसले 

आता हवे महापालिकेचे लक्ष
 
संपूर्ण देशभरात 2021 मध्ये जनगणननेचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हद्दवाढीच्या भागाचा विचार करताना सातारा शहराची लोकसंख्या चार लाखांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे आणखी थोडा भाग शहरात समाविष्ट करून महापालिका तयार करता होऊ शकते. पालिकेच्या हद्दवाढीच्या निर्णयाला 40 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आहे. हे पूर्वानुभव गाठीशी असल्याने साताऱ्याची महापालिका होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पावले उचलली पाहिजेत.

सातारच्या इतिहासात आठ सप्टेंबरला विशेष महत्त्व; जाणून घ्या कारण

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar Supports MLA Shivendrasinghraje Bhosale Satara News