Ajit Pawar
esakal
उपमुख्यमंत्री अजित पवारांचा साताऱ्यात अचानक दौरा
पोर्चमधील फुटलेल्या फरशांबाबत अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
मागील सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त
सातारा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) हे आज सकाळी अचानक अल्प वेळ सातारा शासकीय विश्रामगृहात आले होते. या वेळी नवीन विश्रामगृहाच्या पोर्चमधील फरशांना तडे गेल्याचे पाहून त्यांनी अधिकाऱ्यांना या फरशा का बदलल्या नाहीत, अशी विचारणा करत फैलावर घेतले. मागील वेळी ते दौऱ्यावर आले असताना त्यांनी या फुटलेल्या फरशा बदला असे सांगितले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी आतातरी या फरशा बदला असा सल्ला दिला.