
कास : श्री उतेश्वर यात्रेच्या निमित्ताने दरे या गावी मुक्कामी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुनावळे (ता. जावळी) येथे पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत दुपारी १२ च्या दरम्यान बैठक घेणार आहेत. या बैठकीत जिल्ह्यातील पर्यटनवाढ, नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंबंधीची प्रक्रिया तसेच कोयना पर्यटन या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.