
प्रशांत घाडगे
सातारा : ‘हर घर जल’ अंतर्गत जलजीवन मिशन योजना २०१९ मध्ये सुरू झाल्यानंतर मार्च २०२४ पर्यंत ही योजना १०० टक्के पूर्ण करणार असल्याची घोषणा मोदी सरकारने केली होती. मात्र, आतापर्यंत या योजनेला तीनदा मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील ६० टक्के कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मागील सहा वर्षांत एक हजार ५५६ योजनांपैकी केवळ ६८६ योजनांना अंतिम स्वरूप दिले आहे. निधीअभावी कामे रखडली आहेत.