Satara News : मुसळधार पावसामुळे पाटणमध्ये सहा घरांची पडझड; पंचनामे करण्याचे काम सुरू
Destruction in Patan Due to Downpour; दरम्यान, नवारस्ता, ढेबेवाडी मार्गावरील सांगवड पुलापासून थोड्या अंतरावर सांगवड गावपोच रस्ता मुसळधार पावसाने खचला आहे. प्रशासनाने खचलेल्या ठिकाणी भराव टाकून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत खुला केला आहे.
Heavy rains cause destruction in Patan; six houses collapse, officials begin panchnamaSakal
पाटण : मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सहा घरांची पडझड झाली. सांगवड गावपोच रस्ता खचला आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती केली असून, पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तहसीलदार अनंत गुरव यांनी दिली.