पाेलिस बनले भिकारी, रुग्ण अन् कुरिअर बाॅय; फरारी आराेपी पकडले

पाेलिस बनले भिकारी, रुग्ण अन् कुरिअर बाॅय; फरारी आराेपी पकडले

सातारा : शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील अनेक वर्षांपासून फरार असलेल्या पाच संशयित आरोपींना अटक करण्यात शिरवळ गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश आले आहे. याचबरोबर घरफोडी, फसवणूक आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली आहे. 

पाेलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल साता-यात येताच त्यांनी कामाचा धडाका चालू केला आहे. शिरवळच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) उत्तम कामगिरी केली आहे. डीबीच्या पथकाने गेल्या आठवड्यात ग्राहकांची सुमारे 30 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक व त्याच्या पत्नीला अटक केली होती. हे दोघेही दोन वर्षांपासून फरार होते. त्याशिवाय दारूबंदीच्या गुन्ह्यामध्ये एक वर्षांपासून फरार संशयित आरोपी सचिन ऊर्फ मिलिंद बबन रासकर यालाही लोणंदच्या एमआयडीसीतून अटक करण्यात आली हाेती.

याबराेबरच शिरवळ येथील शिर्के कंपनी परिसरात निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत असणार्‍या संशयित भोर येथील अशोक ज्ञानोबा जाधव यालाही ताब्यात घेतले. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

समर्थांच्या किष्किंधाकांडाचे मुद्रणास साताऱ्यात प्रारंभ 

चार वर्षांपूर्वी खासगी बँकेच्या एका कर्मचार्‍याने महिला बचत गटाची दीड लाखाची फसवणूक केली होती. त्यानंतर अनिल मधुकर चव्हाण, (रा. इंजबावी, पंढरपूर) याला अटक केली होती. याचबरोबर काही दिवसांपूर्वी चौपाळा येथे अपघात करून पलायन केलेला कार चालक अजितकुमार सपकाळ याच्याही मुसक्या शिरवळ डीबीच्या पथकाने आवळल्या. सन 2016 मध्ये शिरवळ येथील पळशी रस्त्यावरील कुरिअरचे कार्यालय फोडून चोरी केल्याप्रकरणी पुरंदर येथीली सतिश बाळासो चव्हाण याला फलटण येथून अटक केली.

पोलिस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, हवालदार रविंद्र कदम, अप्पासाहेब कोलवडकर, जितेंद्र शिंदे, वैभव सुर्यवंशी, अमोल जगदाळे, स्वप्निल दौंड, आणि महिला पोलीस अंमलदार एफ. पी. निर्मळ यांच्या पथकाने केल्या.

खंबाटकीच्या एस वळणावर सुरक्षिततेच्या अनाेख्या उपाययाेजना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com