
सातारा जिल्ह्याकरिता तीन लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यातील एक लाख शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उद्दिष्ट होते.
कऱ्हाड (जि. सातारा) : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या 54 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेत मंत्री देसाई यांच्या नेतृत्वाखाली पाटण विधानसभा मतदारसंघात एक लाख शिवसेना सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
ज्या आजीनं मांडीवर प्राण सोडला, त्याच आजीच्या तिरडीवरुन नाना पाटील पोलिसांना तुरी देत पसार झाले!
सातारा जिल्ह्याकरिता तीन लाख शिवसेना सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यातील एक लाख शिवसेना सदस्यांची नोंदणी एका पाटण विधानसभा मतदारसंघात करण्याचे उद्दिष्ट होत. त्यानुसार आज स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त व गृहराज्यमंत्री देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण मतदारसंघातील शिवसेना सदस्यांची नोंदणी केलेले 71 हजार अर्ज शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांच्याकडे गृहराज्यमंत्री देसाई व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. उर्वरित राहिलेले 29 हजार शिवसेना नोंदणी अर्ज एक महिन्याभरात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मुंबईकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे