mandhardevi kalubai yatra
sakal
वाई - मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षिक यात्रा आज शाकंभरी पौर्णिमेला शिस्तबद्ध पद्धतीने शांततेत व उत्साहात साजरी झाली. कडाक्याच्या थंडीमुळे पहाटे भाविकांची गर्दी कमी होती. मात्र, सूर्योदयानंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभरात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.