पंचायतीचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले : नगराध्यक्ष धनाजी जाधव

रुपेश कदम
Sunday, 11 October 2020

श्री. जाधव हे आमदार गोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

दहिवडी (जि. सातारा)  : येथील नगराध्यक्षपदी धनाजी जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाक्‍यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. जाधव यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी होती.
 
नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी धनाजी जाधव यांची निवड घोषित केली. निवडीनंतर नगराध्यक्ष जाधव यांचा सत्कार आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, ऍड. भास्करराव गुंडगे, माजी सभापती अतुल जाधव, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे, शिवाजी शिंदे, महेंद्र कदम, संजय काशीद, लिंगराज साखरे, नंदकुमार खोत, लालासाहेब ढवाण, सयाजी मोरे आदी उपस्थित होते.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'!

निवडीच्या बैठकीवेळी माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, माया खताळ, जयश्री कोकरे, नाझीया शेख, वैशाली कदम, नीलम शिंदे, बाळासाहेब गुंडगे, समीर योगे, नलिनी काशीद, राजाराम इंगवले, महेंद्र जाधव, रवींद्र सकुंडे आदी नगरसेवक उपस्थित होते. श्री. जाधव हे आमदार गोरे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

माशांचे गळ अन्‌ खाणाऱ्यांची चंगळ.!

दहिवडी शहराच्या विकासासाठी व जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आगामी काळात नगरपंचायतीचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले राहतील. आमदार जयकुमार गोरे व शासनाच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात येईल.

- धनाजी जाधव, नगराध्यक्ष 

Edited By : Siddharth Latkar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhanaji Jadhav Elected As Dhaiwadi Mayor MLA Jaykumar Gore Satara News