

Teacher Success Story Dhanashree Kalukhe Turns Two Mark Failure Into Zilla Parishad Teacher Job Through Hard Work
sakal
-मनाेज पवार
दुधेबावी : तिरकवाडी (ता. फलटण) येथील सौ. धनश्री निलेश काळूखे यांची पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे पदवीधर शिक्षिका म्हणून निवड झाली आहे. सन २०२२ मध्ये झालेल्या शिक्षक भरती परीक्षेत अवघ्या दोन गुणांनी त्यांना यशाने हुलकावणी दिली होती. मात्र, त्या अपयशाने खचून न जाता त्यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अथक परिश्रमाच्या जोरावर अखेर शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले.