
कऱ्हाड : हणबरवाडी- धनगरवाडी उपसा सिंचन योजना गेली अनेक वर्ष रखडली होती. सध्या हणबरवाडीचे काम पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांना त्याचे आवर्तन चालू आहे; परंतु बहुप्रतिक्षित धनगरवाडी उपसा सिंचन टप्पा क्रमांक एकचे काम पूर्ण झाले आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात टप्पा क्रमांक एकची चाचणी करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येणार असल्याची माहिती आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.