
सातारा : विधानसभेच्या निवडणुकीतील यशानंतर भाजपने आता राज्यभर पक्ष सदस्य नोंदणी अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मोबाईलवर मिस्ड कॉल करून सदस्यत्व घेता येणार आहे. संघटनात्मक जबाबदारी घेऊन काम करणाऱ्यांना वैयक्तिक कमीत कमी दोनशे प्राथमिक सदस्य करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कमीत कमी दहा लाख प्राथमिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करणार आहे. या अभियानात जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर असेल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.