याबाबत पाणी बचाव संघर्ष समितीने सातारा सिंचन मंडळ, सातारा सिंचन विभाग, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ आणि जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
कोरेगाव : धोम धरणातून कृष्णा नदी पात्रात जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी (Jihe Kathapur Yojana) नियमबाह्य सोडलेले पाणी तातडीने बंद करावे, अन्यथा महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग झाल्याने उच्च न्यायालयात (High Court) दाद मागावी लागेल, तद्वतच तीव्र जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने (Dhom Dam Water Rescue Struggle Committee) आज देण्यात आला आहे.