Jihe Kathapur Yojana
Jihe Kathapur Yojanaesakal

Dhom Water Released : धोमचे पाणी जिहे-कठापूरला सोडल्‍याने संताप: पाणी बचाव संघर्ष समितीचा पवित्रा; शेतकऱ्यांचे मंगळवारी आंदोलन

Satara News : मागील पावसाळ्यात धोम धरणातून ४.६९ टीएमसी पाणी सोडले आहे. त्यामुळे आजमितीस धोम धरणातील साठ्यामधून पाणी देय नसल्‍याची नोंद घ्यावी. या योजनेला खरीप हंगामात सोडण्यासाठी धोम बलकवडी धरणातून ०.५३ टीएमसी पाण्याची तरतूद केली आहे.
Published on

कोरेगाव : धोम धरणातून कृष्णा नदीपात्रात जिहे- कठापूर उपसा सिंचन योजनेसाठी सोडलेले नियमबाह्य पाणी तातडीने बंद करावे, अन्यथा मंगळवारी सातारा सिंचन भवनासमोर उपोषण करण्याचा इशारा आज धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती वाई- जावळी- सातारा- कोरेगावच्या वतीने देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com