गुंड जामिनावर बाहेर आले तर देशात, राज्‍यात मोठा उद्रेक होईल : उदयनराजे

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Summary

काही प्रकरणांत पोलिस यंत्रणा लोकप्रतिनिधींच्‍या दबावाखाली काम करते. यामुळे अन्‍यायग्रस्‍ताला पोलिसांकडून न्‍याय मिळत नाही.

सातारा : खुनाचा प्रयत्‍न आणि जबरी चोरीचा गुन्‍हा दाखल असणारा नगर विकास आघाडीचा (Nagar Vikas Aghadi Satara) नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे (Corporator Balu Khandare) हा पोलिसांना (Satara Police) सापडत नाही. त्‍याचे अटकेत असणारे साथीदार जामिनावर सुटले आहेत. पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांशी त्‍यांची हातमिळवणी असल्‍याचा आरोप खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी खंदारेच्‍या मुद्‌द्यावरून नाव न घेता उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यावर टीका केली.

उदयनराजे म्‍हणाले, नागरिक म्‍हणून मी मत मांडतोय. काही प्रकरणांत पोलिस यंत्रणा लोकप्रतिनिधींच्‍या दबावाखाली काम करते. यामुळे अन्‍यायग्रस्‍ताला पोलिसांकडून न्‍याय मिळत नाही. दबावातील पोलिस नंतर सांगतोय तशीच तक्रार दे, हे नाव घेऊ नको, असे फिर्यादीस सांगतात. कशासाठी हे सगळे. साताऱ्यातील गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलिस अधिकारी, सरकारी वकील, तसेच न्‍यायव्‍यवस्‍थेत सहभागी असणाऱ्या प्रत्‍येकाने आपण समाज घटक असल्‍याचे विसरू नये. आज कुणावर तरी हल्‍ला झाला, उद्या दुसऱ्यावर होईल, परवा तुमच्‍यावर होऊ शकतो. मग त्‍या वेळी तुम्‍ही कोठे जाणार.

Udayanraje Bhosale
हिंमत असेल तर ED नं माझ्याकडं यावं, पुराव्यासकट यादी देईन : उदयनराजे

काही न्‍यायालयीन प्रकरणांना वेगळे वळण देण्‍यात येत आहे. यात पोलिस अधिकारी, सरकारी वकील आणि लोकप्रतिनिधींची मिलीभगत आहे. हा आरोप मी नागरिक म्‍हणून करत आहे. गंभीर गुन्‍हा दाखल असणारा खंदारे पोलिसांना सापडत नाही. दहशत माजविणाऱ्याला तिकीट द्यायचे, निवडून आणायचे आणि त्‍याच्‍या दहशतीचा वापर स्‍वत:च्‍या निवडणुकीवेळी करायचा. कोण देत त्‍याला तिकीट, कोण निवडून आणते. त्‍याचा पाठीराखा कोण हे सगळ्या सातारकरांना माहीत आहे. गंभीर गुन्‍हे असणारे गुंड जामिनावर बाहेर आले तर देशात, राज्‍यात मोठा उद्रेक होईल, असे मतही त्‍यांनी या वेळी व्‍यक्‍त केले.

Udayanraje Bhosale
महाराजांना Petrol परवडत नाही, मग BMW कशावर चालवणार?

काय तुमचा वचक...

वा... लोकप्रतिनिधी... वा काय तुमचा वचक. कोणाला पाठीशी घालताय, कशासाठी? अशा शब्‍दांत उदयनराजेंनी नाव न घेता शिवेंद्रसिंहराजेंवर (MLA Shivendrasinharaje Bhosale) टीका केली. मी सर्वसामान्‍यांसाठी आवाज उठवतो म्‍हणून माझ्‍यावर खंडणीच्‍या केसेस टाकल्‍या गेल्‍या. खंदारेवर यापूर्वी गोळीबार, तसेच आनेवाडी टोलनाक्‍याच्‍या अनुषंगाने दाखल गुन्ह्यातील शस्‍त्रे पोलिसांना जप्‍त करता आली नाहीत, या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर धबाय...बाबा.. बघा आता तुम्‍हीच, असे म्‍हणत दाढी कुरवळतात तशा पद्धतीने स्‍वत:च्‍या चेहऱ्यावर हात फिरवत त्‍यांनी पुन्‍हा एकदा शिवेंद्रसिंहराजेंवर टीका केली.

Udayanraje Bhosale
Dussehra 2021 : किरीट सोमय्यांच्या 'रावणा'वर पोलिसांची धडक कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com