

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
esakal
-अशपाक पटेल
खंडाळा : नायगाव (ता . खंडाळा ) येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील शिवप्रसाद चम्पांती या दिव्यांग मुलाने इयत्ता १० वी च्या बोर्ड परिक्षेत ६६% गुण मिळविले आहे . शिवप्रसाद ला चालता व बोलताही येत नसताना आई -वडिल शिक्षक व विद्यार्थी च्या मदतीने इच्छाशक्तीच्या जोरावर लेखनीकाची मदत न घेता एका दिव्यांग विद्यार्थ्याने आपल्या कर्तृत्वातून हे यश मिळविले आहे .यानिमित्ताने शिवप्रसादचे सर्वत्र कौतुक होत आहे.