

Political activity intensifies in Limb as parties prepare for a crucial electoral battle.
sakal
-सुधीर जाधव
गोवे : सातारा तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंब जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी निवडणुकीसाठी झालेल्या फेररचनेमुळे आणि आरक्षण बदलामुळे हा गट संपूर्ण जिल्ह्याच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या भागात आता राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारण्याची तयारी केली असून, महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन मित्रपक्षांतच येथे काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.