
सातारा : सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावळी, महाबळेश्वर तालुक्यांतील आडोशी, माडोशी, रवंदी, खिरखिंडी, कुसापूर, तांबी, वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ गावी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत. जंगलातील कोअर झोनमधील क्षेत्रात त्यांनी ठाण मांडून संसार थाटला.