esakal | तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून 'वाद'; तडजोडीने खबालेंच्या नावावर शिक्कामोर्तब
sakal

बोलून बातमी शोधा

Tantamukti Committee

तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने निवडीवरून ग्रामसभेत खडाजंगी झाली.

तंटामुक्त अध्यक्ष निवडीवरून 'वाद'

sakal_logo
By
विलास खबाले

विंग (सातारा) : ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी (Tantamukti Committee) दोन अर्ज दाखल झाल्याने निवडीवरून ग्रामसभेत खडाजंगी झाली. मात्र, तडजोडीने आनंदराव खबाले यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. या वेळी २४ बाय ७ मीटरला नळजोडणी नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित ग्राहकाचे नळ कनेक्शन बंद करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) निर्बंध शिथिल झाल्याने तब्बल दोन वर्षांनी सरपंच शुभांगी खबाले यांच्या अध्यक्षतेखाली येथे ग्रामसभा झाली. २४ बाय ७ घरगुती नळकनेक्शन मीटर जोडली आहेत. मात्र, मीटरपुढे नळजोडणी केलेली नाही. त्यामुळे पाणीचोरी होत असून, मोठे नुकसान होत आहे. हा आकडा दरमहा ५० हजारांवर आहे. त्या मुद्‍द्यावरून संबंधित ग्राहकाचे नळकनेक्शन बंद करा, असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या परवानगीने येथील गायरान जागेत बहुउदेशीय क्रीडांगण प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. उपसरपंच सचिन पाचुपते यांनी मुद्दा उपस्थित केला. तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाल्याने निवडीवरून पेच निर्माण झाला. या वेळी जोरदार खडाजंगी झाली.

हेही वाचा: 'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'

तडजोडीने जयवंत पाटील यांनी माघार घेतल्याने आनंदराव खबाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. उपाध्यक्ष म्हणून विकास होगले यांची निवड झाली. निवडीनंतर नवनिर्वाचित श्री. खबाले व श्री. होगले यांचा सत्कार करण्यात आला. विविध विषयांवर चर्चा झाली. शंकरराव खबाले, प्रा. हेमंत पाटील, बाबूराव खबाले, संजय खबाले, बबनराव शिंदे, शंकर ढोणे, रमेश खबाले, राजेंद्र खबाले, संपत खबाले यांनी चर्चेत सहभाग घेतला. ग्रामविकास अधिकारी किसन रोंगटे यांनी प्रोसिडिंग वाचन केले.

loading image
go to top