esakal | 'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Shinde

राष्ट्रवादीचे शशीकांत शिंदे पुन्हा मंत्री झाले असते, तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता.

'माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही'

sakal_logo
By
अतुल वाघ

वाठार स्टेशन (सातारा) : शशीकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) आपल्या भाषणात सातत्यानं म्हणतात, मला निवडून दिलं नसल्यानं कोरेगाव तालुक्याचं मोठं नुकसान झालंय. 2013-14 ला यांना मंत्री पद दिलं. त्यावेळी उरमोडीतील पाणी सांगलीत गेलं. मात्र, मतदारसंघातील गुंठाभर जमीन भिजली नाही. आता पुन्हा मंत्री झालं असते, तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता. त्यामुळे जे झालं त्यात जिल्हा खुश झाला, असा सणसणीत टोला कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde) यांनी पिंपोडे खुर्द येथील जाहीर सभेत लगावला.

पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथील पाणी पुरवठा योजना (Water supply scheme), तसेच 82 लाखांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी राहुल कदम, जिल्हा नियोजन सदस्य राहुल बर्गे, भाजप (BJP) तालुकाध्यक्ष संतोष जाधव, पोपट भोज, विलास पवार, अमर पवार, चंद्रकांत पवार, शिवाजी कदम, दिनकर कदम, तानाजी गोळे, रत्नदीप फाळके, सातारारोडचे सरपंच किशोर फाळके उपस्थित होते. महेश शिंदे पुढे म्हणाले, कोरेगाव मतदारसंघात (Koregaon constituency) मागील दहा वर्षांत येथील माजी आमदाराने खोटं बोल पण रेटून बोल, अशी भूमिका घेत केवळ नारळ फोडण्याचा उद्योग केला. या नारळानेच त्यांना घरचा रस्ता दाखवला तरीही हे महाशय अजूनही नारळ फोडत आहेत. मी शिवसेनाचा (Shiv Sena) आमदार आहे, याचं भान ठेवा. त्यामुळे माझ्यावर बोलताना विचार करून बोला आणि माझ्या नादाला लागू नका, नाहीतर आता थोडक्यात पडलायं. पुढच्या वेळी डिपॉझिट पण ठेवणार नाही, असा इशारा आमदार महेश शिंदे यांनी दिला.

हेही वाचा: पत्रकारांनी 'दहशतवादी' म्हणणं बंद करावं, अन्यथा..

आमदार शिंदे म्हणाले, मी जातीवंत शेतकरी आहे. आम्ही डोंगरात भात पिकवत नाही. आम्ही पायऱ्याने शेती करतो. जोपर्यंत आमच्या पायऱ्यातील शेवटच्या शेतकऱ्यांची मळणी होत नाही, तो पर्यंत आम्ही पायऱ्या सोडत नाही. पायऱ्या सोडण्याची आमची नाही तर, ती तुमची औलाद आहे, असा टोला त्यांनी यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांना लगावला. आठवड्यापूर्वी याच स्टेजवर त्यांची सभा झाली. त्यावेळी मी कोणत्या पक्षात आहे, ते समजत नाही असा प्रश्न त्यांनी केला होता. खरंतर यावेळी या स्टेजवर बसलेली लोक शुद्धीत नव्हते. मी आमदार झाल्यानंतर कोरेगाव मतदारसंघात झालेला बदल त्यांना दिसत नाही. त्यामुळे ते आता शुद्धीत नाहीत. ते त्यांच्या भाषणात सतत बोलतात मला निवडून दिलं नसल्याने कोरेगाव तालुक्याच मोठं नुकसान झालं. 2013-14 ला यांना मंत्री पद दिलं. त्यावेळी उरमोडीतील पाणी सांगलीत गेलं. मात्र, मतदारसंघातील गुंठाभर जमीन भिजली नाही. आता पुन्हा मंत्री झालं असते तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता. त्यामुळे जे झालं त्यात जिल्हा खुश झाला, असा टोला ही त्यांनी लगावला.

हेही वाचा: साताऱ्यात राजे समर्थकांत तुफान 'राडा'; सहाजण गंभीर, 16 जणांवर गुन्हा

केवळ खोट बोलण्यात माहिर असलेल्या माजी आमदार शशीकांत शिंदेंनी कोरोना काळात 10 वर्षांपासून त्यांना साथ देणाऱ्या जनतेला वाऱ्यावर सोडून मुंबईला पळ काढला. यावेळी मी आणि माझे कार्यकर्ते या लढाईत झोकून घेत येथील जनतेसाठी कोविड हॉस्पिटलची उभारणी केली आणि पहिल्या लाटेत 1400 रुग्णांना जीवदान दिले. आजही हे काम सुरू आहे. आपण काय केलं आपण 300 बेडच कोरोना हॉस्पिटल कुठं उभारलं त्याचा शोध अजून लागला नाही. यावेळी राहुल कदम, श्रीपाद कदम, जितेंद्र कदम, नामदेव कदम यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं.

loading image
go to top