कऱ्हाडात 18 घंटागाड्यांसह तीन ट्रॅक्टर बंद

Karad Municipality
Karad Municipalityesakal

कऱ्हाड (सातारा) : कोणत्या ना कोणत्या कारणाने पालिकेतील (Karad Municipality) राजकारण गाजत आहे. सभेवरून, सभेतील विषय मंजुरीवरून, बजेटवरून (Municipality Budget) तर बजेटच्या मंजुरीवरूनही आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी येथे झडतातच. आज तर चक्क कचऱ्यावरूनच राजकीय वाद उफाळला. कचरा (Garbage) गोळा करणाऱ्या घंटागाड्याची निविदेची मुदत संपल्याने त्याकडे झालेले दुर्लक्ष आजच्या राजकीय वादाचे मूळ ठरल्याने कऱ्हाडला राजकारणाचाच कचरा झाल्यासारखी स्थिती दिसली. या गोंधळात शहरातील घराघरांतील तब्बल आठ टन कचरा उचलला गेला नाही, हेच वास्तव आहे. (Dispute Started In Political Party Over Garbage Collection In Karad Municipality Satara Political News)

Summary

शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांच्या नवीन निविदेचा कार्यादेश तयार आहे. मात्र, त्या ठरावावर स्वाक्षऱ्या झालेल्या नाहीत.

शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांच्या नवीन निविदेचा कार्यादेश तयार आहे. मात्र, त्या ठरावावर स्वाक्षऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे कचरा संकलन (Garbage collection), विघटनाची प्रक्रिया बंद पडली. नवीन ठेकेदाराला प्रत्यक्ष कार्यादेश नाही तर जुन्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे कचरा गोळा करणाऱ्या १८ घंटागाड्यांसह तीन ट्रॅक्टर बंद होते. घराघरांतील सरासरी आठ टन कचरा उचलला गेला नाही. रस्ते सफाई व गटार स्वच्छतेचे कामही झाले नाही. त्यावरून जनशक्ती (Janshakti Aghadi), लोकशाही (Lokshahi Aghadi), भाजप (BJP) व नगराध्यक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोप झाले. त्या वादामुळे घराघरांतील कचरा मात्र उचलला गेला नाही.

Karad Municipality
छत्रपतींच्या गादीला डावलण्याचा भाजपचा प्रयत्न

घंटागाड्यांचा कार्यादेश तयार आहे. मात्र, ठरावावर नगराध्यक्षा शिंदे (Mayor Rohini Shinde) यांनी स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रश्न चिघळला आहे. ३० जून रोजी जुन्या ठेकेदाराची संपलेली मुदत दहा दिवस वाढविण्यात आली. तीही संपली आहे. नवीन ठेकेदाराची प्रक्रिया पूर्ण आहे. मात्र, त्याचा उपयोग नाही. त्यामुळे कचऱ्यासारख्या गंभीर स्थितीशी स्वच्छ कऱ्हाडला सामना करावा लागतो आहे. नगराध्यक्षांनी वेळीच ठरावावर स्वाक्षरी करण्याचे गांभीर्य ठेवावे.

-विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती, कऱ्हाड

कचऱ्यावरून जनशक्ती व लोकशाहीचे नगरसेवक आरोप करत आहेत. नवीन घंटागाड्यांचा तो ठराव बुधवारी माझ्याकडे आला. दुसऱ्या दिवशी विशेष बैठक झाली. शुक्रवारी डोळ्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे त्याकडे बघता आले नाही. दोन दिवस सुटीच होती. निविदेत काही तांत्रिक गोष्टी सोडवून ठरावावर सही करणार होते. तसे ठेकेदारांशीही बोलणे झाले होते. मात्र, त्याचाच गैरफायदा घेऊन विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. हे षडयंत्र आरोग्य सभापतींनी मुद्दाम घडवून आणले आहे. मोठ्या ठेकेदारांची बिले मंजूर व्हावीत असा त्यामागचा हेतू आहे. मात्र, त्याचा फारसा परिणाम होणार नाही. निवडणुका जवळ आल्याने विरोधकांचे हे सारे सुरू आहे. नागरिकही ते जाणून आहेत.

-रोहिणी शिंदे, नगराध्यक्षा, कऱ्हाड

सकाळपासून नागरिकांचे फोन आल्याने घंटागाडीचा घोटाळा झाल्याचा लक्षात आले. मुख्याधिकारी यांच्याकडून निविदा प्रक्रिया झाली आहे. मात्र, त्यावर नगराध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या नाहीत, असे कळाले. वास्तविक त्यावर सही होणे गरजेचे होते. कोविडच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होतो आहे. तो होऊ नये. अन्यथा प्रसंगी आम्ही आमच्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन कचरा उचलण्याची पर्यायी व्यवस्था करू.

-सौरभ पाटील, गटनेते, लोकशाही आघाडी

Karad Municipality
शरद पवारांचं 'ते' वक्तव्य म्हणजे, 'चोर की दाढी मे तिनखा'

कचरा उचलण्याच्या निविदेची मुदत संपली होती. नवीन ठेकेदारांना परवानगीची फाइल काही कारणाने नगराध्यक्षांकडे प्रलंबित आहे. त्यांना विनंती केली आहे. त्यांची सही झाल्यानंतर काम सुरू करणार आहोत. कार्यादेश नसल्याने ठेकेदाराच्या ताब्यात पालिकेची वाहने देऊ शकत नाहीत. नगराध्यक्षांकडून विलंब झालाच तर स्थायी समितीच्या सदस्य त्या ठरावावर स्वाक्षऱ्या करून निविदा प्रक्रिया राबवण्यास परवानगी देतील.

-रमाकांत डाके, मुख्याधिकारी, कऱ्हाड

Dispute Started In Political Party Over Garbage Collection In Karad Municipality Satara Political News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com