esakal | शरद पवारांचं 'ते' वक्तव्य म्हणजे, 'चोर की दाढी मे तिनखा'; शेलारांचा निशाणा
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ashish Shelar

मराठा समाजाचे आरक्षण, शेतकऱ्यांना मदत, बारा बलुतेदारांना मदत व ओबीसींच्या राजकीय (OBC Political Reservation) कायदा अशा सगळ्याच पातळ्यावर राज्य सरकारची राजकीय टगेगिरी सुरू आहे.

शरद पवारांचं 'ते' वक्तव्य म्हणजे, 'चोर की दाढी मे तिनखा'

sakal_logo
By
सचिन शिंदे, हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : मराठा आरक्षण (Maratha Reservation), शेतकऱ्यांचे प्रश्न, ओबीसीचे आरक्षणासह (OBC Reservation) बलुतेदारांचा प्रश्न अशा सगळ्याच पातळ्यावर प्रश्न सोडवायचे बाजूला ठेऊन राज्य सरकारमधील शिवसेना (ShivSena), राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेस (Congress Party) अशा तिन्ही पक्षांची राज्यभर टगेगिरी सुरू आहे, अशी टीका भाजपचे आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी येथे केली. भाजप पक्ष मजबुतीसाठी येथे त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर श्री. शेलार पत्रकारांशी बोलले. (MLA Ashish Shelar Criticizes NCP President Sharad Pawar Satara Political News)

जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore), सरचिटणीस अतुल भोसले, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, प्रवक्ते भरत पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी उपस्थित होते. आमदार शेलार म्हणाले, ‘‘मराठा समाजाचे आरक्षण, शेतकऱ्यांना मदत, बारा बलुतेदारांना मदत व ओबीसींच्या राजकीय (OBC Political Reservation) कायदा अशा सगळ्याच पातळ्यावर राज्य सरकारची राजकीय टगेगिरी सुरू आहे. कारण मराठा आरक्षण फडणवीस सरकारने (Fadnavis Government) दिले. त्याचा एक वर्षे फायदा मिळाला. मात्र, सरकार बदलल्यानंतर तो कायदा का टिकला नाही, याचे उत्तर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) द्यावे लागेल. कोर्टासमोर योग्य रणनीतीने बाजू का मांडली नाही, याचे ठाकरे सरकारला (Thackeray Government) उत्तर द्यावे लागेल.

हेही वाचा: ‘जरंडेश्‍वर’वर ‘ईडी’ला पाय ठेवू देणार नाही; आमदार शिंदेंचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाने अपिलावर निकाल दिला. त्या वेळी राज्य सरकारने स्वतः माजी न्यायाधीश भोसले यांची समिती नेमली. त्या समितीनेही आयोग नेमला पाहिजे, तरच आरक्षण टिकाव धरेल, अशी सूचना राज्य सरकारला केली आहे; पण त्यालाही ठाकरे सरकार बगल देत आहे. राज्य सरकार केंद्राने निर्णय घ्यावा, असे सुचविते आहे. त्यामागे मराठा समाजाला (Maratha Community) कधीच आरक्षण मिळू नये, अशी भावना या तीन पक्षांची आहे.’’ श्री. शेलार म्हणाले, ‘‘विधानसभा सत्रात कृषी कायद्यावर चर्चा झाली. महाविकास आघाडीने त्या बद्दलची माहिती व सूचना लोकांकडून मागण्यासाठी प्रस्तावित केले आहे. मोदी सरकारने संमत केलेले तिन्हीही केंद्रीय कृषी कायदे महाविकास आघाडीने रद्द केले आहेत का, याचे आघाडी सरकारने उत्तर द्यावे. प्रत्यक्षात मोदी सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना महाराष्ट्र विधानसभेत तत्त्वतः मंजुरी दिली आहे. त्यात थोड्याफार सुधारणा व फरक केला आहे. वर्षभर आंदोलने व शेतकऱ्यांमागे खोटे आश्रू कशासाठी वाहिले. त्यामुळे त्यांची सगळी नौटंगी बाहेर आली आहे.’’

हेही वाचा: 'महाविकास'ला कुबड्या घेऊनच चालावे लागणार, आशिष शेलारांची टीका

चोर की दाढी मे तिनखा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सहकार खात्याच्या निर्मितीवरून केलेल्या वक्तव्यावरही आमदार शेलार यांनी आक्षेप घेतला. सहकारातून समृद्धी असे ब्रीद घेऊन आम्ही जनतेसमोर येत आहोत. त्यामुळे आमचा हेतू स्पष्ट असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य कठीण आहे. हस्तक्षेपाबद्दलची भीती का वाटते आहे. याचा अर्थ म्हणजे ‘चोर की दाढी मे तिनखा’ अशीच त्यांची अवस्था झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.

MLA Ashish Shelar Criticizes NCP President Sharad Pawar Satara Political News

loading image