कोरोनाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी, आशा सेविकांना माधव रसायन गुटी!

विलास साळुंखे
Sunday, 20 September 2020

देश कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्‍यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत.

भुईंज (जि. सातारा) : कोविडच्या आलेल्या अस्मानी संकटाचा सामना करण्यासाठी आशासेविका आरोग्यदूत बनत आपला जीव धोक्‍यात घालून समाजाची सेवा अल्प मानधनावर करीत आहेत. या आशासेविकांच्या मानधनवाढीसाठी आपण शासनस्तरावर प्रयत्न करून त्यांच्या कष्टाला न्याय देणार असल्याचे प्रतिपादन भाजपच्या जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले-चव्हाण यांनी केले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील आशा सेविका मंगला जाधव, अनिसा मोमीन, सुजाता खरे, शुभांगी धुरगुडे, संगीता दगडे, अनुपा एरंडे या आशासेविकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ऑक्‍सिमीटर, सॅनिटायझर, माधव रसायन वटी या किटचे वाटप करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. देश कोरोनासारख्या भयंकर रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. या भीषण परिस्थितीत आशाताईंनी आपला जीव धोक्‍यात घालून शासनाने दिलेल्या कामाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत कोविड विरुद्धच्या लढाईत आघाडीवर आहेत.

लेह-लडाख सीमेवर जवान सचिन जाधव यांना वीरमरण, दुसाळेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

त्यांच्यावर कामाचा असणारा ताण व त्याबदल्यात मिळणारे अल्प मानधन यात मोठी तफावत आहे. त्यांच्या श्रमाला योग्य तो दाम मिळालाच पाहीजे, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. यापूर्वी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात आशाताईंना गुड्‌ची टॅबलेट, सॅनिटायझर व ऑक्‍सिमीटरचे वाटप करण्यात आले होते. या वेळी सरपंच पुष्पाताई भोसले, उपसरपंच प्रशांत जाधवराव, अर्जुनराव भोसले, माजी सरपंच अनुराधा भोसले, आरोग्य सेवक राजेंद्र पांढरपट्टे, कृष्णकांत शिंदे उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Distribution Of Madhav Rasayan Guti To Asha Sevika Satara News