
भारीच! फलटणला माणुसकीचं दर्शन, मोकाट जनावरांना दिलं चाऱ्याचं अन्न
कोळकी (सातारा) : फलटण येथे जैन सोशल ग्रुपच्या वतीने श्री 1008 भगवान महावीर यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. फलटणच्या ब्लड बॅंकेमध्ये रक्तदान शिबिर झाले. त्यात 27 बांधवांनी रक्तदान केले. गेल्या 16 वर्षांपासून दरवर्षी श्री भगवान महावीर जयंती दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. सकाळी नऊ वाजता श्री भगवान महावीर किर्ती स्तंभाजवळ श्री भगवान महावीरांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर फलटणमधील रस्त्यावर, चौकांत फिरत असलेल्या गाईंसाठी एक ट्रॉली चारावाटप करण्यात आले. त्यामध्ये गजानन चौक, महात्मा फुले चौक, प्रांत ऑफिस परिसर, गिरवी नाका, भडकमकरनगर, मारवाड पेठ, श्री शंकर मार्केट, पाच बत्ती चौक, छत्रपती शिवाजी चौक व जाधववाडी येथील श्री साई मंदिर परिसरात असणाऱ्या गाईंना चारा वाटप करण्यात आला. यावेळी ब्लड बॅंकेचे अध्यक्ष डॉ. बिपीन शहा, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. सूर्यकांत दोशी, उपाध्यक्ष अजित दोशी, डॉ. अशोक व्होरा, डॉ. ऋषीकेश राजवैद्य, युवा फोरमचे अध्यक्ष सिध्देश शहा, डॉ. संतोष गांधी, श्रीपाल जैन, मंगेश दोशी, राजेंद्र कोठारी, स्मिता शहा, स्नेहल दोशी, सिद्धांत दोशी, स्वराज शहा, शुभम शहा, तेजस शहा, संकेत गांधी, मयूर शहा, पुनित दोशी, सिद्धांत कोठारी, आकाश दोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
Edited By : Balkrishna Madhale
Web Title: Distribution Of Fodder To The Animals In Phaltan Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..