
वाई शहर: कुसगाव (ता. वाई) येथील क्रशर व खाणपट्टा तूर्त बंद ठेवून जिल्हास्तरीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार, वाई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार, दिलीप पिसाळ, विलास येवले, राजेंद्र सोनवणे, आनंद चिरगुटे, संपत महांगडे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.