
सातारा : राज्यात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे एक कार्यकारी अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. त्यानुसार राज्यभरात एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होतील. त्यापैकी जिल्ह्यात ५२८६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्त्या होतील, त्यापैकी ३३ टक्के महिलांना प्रतिनिधित्व देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली आहे.