
सातारा : इव्हेंटलिस्ट कॉन्फरन्स, ई प्लस, केपीएमजी, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ यांच्या वतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘सर्वोत्कृष्ट बँक’ पुरस्काराचे वितरण गोवा येथे करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे (एनसीयूआय) अध्यक्ष दिलीप संघवी, राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, तेलंगण राज्य सहकारी बँकेचे माजी अधिकारी श्रीनिवास राव यांच्या हस्ते बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, सुनील खत्री, रामराव लेंभे, लहुराज जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, अधिकारी वैभव सावंत, तुषार साबळे यांनी पुरस्कार स्वीकारला.