
सातारा: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींचे नद्या व तलावांत विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे पालिकांनी कृत्रिम तलाव व ग्रामपंचायतींनी जलकुंड गणपती विसर्जनासाठी तयार केले आहेत. त्यामध्येच सार्वजनिक गणेश मंडळांनी व नागरिकांनी गणपती विसर्जित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.