पर्यटनाचा घ्या मनसोक्त आनंद! महाबळेश्‍वर, पांचगणीतील 'पॉईंट' खुले

अभिजीत खुरासणे
Monday, 19 October 2020

महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे मार्चपासून बंद आहेत. पर्यटकांअभावी येथील छोट्या व्यावसायिकांची उपासमार होवू लागली होती. राज्यात अनलॉक चार लागू झाला असून सर्वत्र व्यवसाय टप्प्या-टप्प्याने सुरू झाले. परंतु, पर्यटनस्थळ महाबळेश्वर व पांचगणी येथील व्यवसाय बंदच होते. घोडे व्यावसायिक, टॅक्‍सी व्यवसायिक व येथील छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यापाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली होती.

महाबळेश्वर (जि. सातारा) : पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आमदार मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी येथील काही पॉईंट सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे काळी-पिवळी टॅक्‍सी व घोडे व्यवसाय सुरू करण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दिल्याने दोन्ही शहरातून समाधान व्यक्त केले जात आहे. 

महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे मार्चपासून बंद आहेत. पर्यटकांअभावी येथील छोट्या व्यवसायिकांची उपासमार होवू लागली होती. राज्यात अनलॉक चार लागू झाला असून सर्वत्र व्यवसाय टप्प्या-टप्प्याने सुरू झाले. परंतु, पर्यटनस्थळ महाबळेश्वर व पांचगणी येथील व्यवसाय बंदच होते. घोडे व्यावसायिक, टॅक्‍सी व्यवसायिक व येथील छोटे-मोठे व्यवसाय करणारे व्यापाऱ्यांनी आमदार पाटील यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली होती. व्यवसायाअभावी लोकांची उपासमार होत आहे याकडे लक्ष वेधले.

रोजचा खर्च भागवणं मुश्किल बनलंय, टॅक्सी व्यावसायिक हतबल 

आमदार पाटील यांनी या संदर्भात पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली व त्यांना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. पालकमंत्री व आमदार यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची भेट घेतली व पर्यटन स्थळावरील व्यावसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, तसेच पॉईंटचे रस्ते पर्यटकांसाठी खुले करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर येथील वेण्णालेक बोट क्‍लब, पांचगणी येथील टेबल लॅण्ड सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे घोडे व्यावसायिक, काळी पिवळी टॅक्‍सी धारकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रमाणे इनडोअर गेम व्यवसायालाही जिल्हाधिका-यांनी परवानगी दिली आहे.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Collectors Permission To Open Tourist Spot At Mahabaleshwar Panchgani Satara News