कला, साहित्य क्षेत्रातील अडथळे दूर करण्यास प्राधान्य : आमदार शिंदे

उमेश बांबरे
Tuesday, 20 October 2020

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचारांना आदर्श मानून काम करूया. साताऱ्यातील कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना विना अडचण, तसेच कोणत्याही भीती शिवाय काम करण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही बाळकृष्ण शिंदे यांनी दिली.

सातारा : साताराच्या कला, तसेच साहित्य क्षेत्रातील कोणत्याही कामाला कसल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. जिल्ह्यात कोठेही चित्रीकरण व सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानगी मी स्वत: लक्ष घालून मिळवून देईन, अशी ग्वाही पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाची जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमात पक्ष प्रतोद आमदार शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने व सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पत्र प्रदान करण्यात आले. बाळकृष्ण शिंदे म्हणाले, "राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विचारांना आदर्श मानून काम करूया. साताऱ्यातील कला आणि साहित्य क्षेत्रातील लोकांना विना अडचण, तसेच कोणत्याही भीती शिवाय काम करण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. कलाकारांचे छोटे- मोठे प्रश्‍न योग्य प्रकारे सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.'' 

माणुसकीचे भान ठेऊन पंचनामे करा : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम

जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी आभार मानले. या वेळी नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्रे प्रदान करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष : अविनाश सावंत, संजय पाटील, मंदार शेंडे, सुहार चव्हाण. जिल्हा सरचिटणीस : प्रेम भोसले, सहसचिव नितेश गायकवाड, जिल्हा समन्वयक आरती गौड, प्रसिद्धी प्रमुख जमीर आतार, जिल्हा संघटक अक्षय साळुंखे. तालुकाध्यक्ष : सातारा- डॉ. अजय वाडते, कऱ्हाड दक्षिण- संतोष मोहिते, कऱ्हाड उत्तर- अभिषेक सातपुते, पाटण : ऍड. अनिता वरेकर, वाई- सचिन अनपट, फलटण- अमोल देशमुख, खंडाळा- सुधाकर गाढवे, महाबळेश्‍वर- सोनाली घाडगे, खटाव- योगेश देशमुख, कोरेगाव- प्रणोती थिटे, जावळी- मच्छिंद्र सुतार. शहराध्यक्ष : सातारा- रश्‍मी साळवी, वाई- हेमंत झोरे, फलटण- पृथ्वीराज बर्गे, कऱ्हाड शहर- आनंद चव्हाण, पाटण- संजय डुबल. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: District Executive Of NCP Satara Cultural Department Announced Satara News