esakal | Diwali Festival 2020 ऐन दिवाळीत ठोसेघर परिसरात विजेचा लपंडाव
sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Festival 2020 ऐन दिवाळीत ठोसेघर परिसरात विजेचा लपंडाव

पुणे, मुंबई येथे नोकरी करणारे स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबांसह ठोसेघर परिसरात दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत. महिलावर्ग दिवाळीचे पदार्थ करण्यात व्यस्त असताना गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. विजेची ये-जा सुरू असल्यामुळे गावातील नळ पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

Diwali Festival 2020 ऐन दिवाळीत ठोसेघर परिसरात विजेचा लपंडाव

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : ठोसेघर (ता. सातारा) येथे सलग तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे ऐन दिवाळीत विशेषतः महिलांवर शिमगा करण्याची वेळ आली आहे. विजेच्या लपंडावामुळे दिवाळीच्या फराळाचे काम रखडले आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून बीएसएनएल नेटवर्क ठप्प झाल्यामुळे संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे.  

पुणे, मुंबई येथे नोकरी करणारे स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबांसह ठोसेघर परिसरात दिवाळी साजरी करण्यासाठी आले आहेत. महिलावर्ग दिवाळीचे पदार्थ करण्यात व्यस्त असताना गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. विजेची ये-जा सुरू असल्यामुळे गावातील नळ पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. गिरण्याही दिवाळीत बंद ठेवाव्या लागत आहेत. विजेच्या लपंडावामुळे गावातील पथदिवे बंद पडत असल्यामुळे ठोसेघर रात्रीच्या अंधारात लुप्त होऊन जात आहे.  

महावितरणचा शेतकऱ्यांना जोर का झटका; ऐन ओलिताच्या हंगामात विजेचा लपंडाव

दुसरीकडे बीएसएनएलचे नेटवर्क जाम झाल्यामुळे संपर्काची यंत्रणा कोलमडून पडली आहे. या परिसरात फक्त बीएसएनएल कंपनीचा टॉवर असल्यामुळे बीएसएनएल सिमकार्डला रेंज मिळते. येथील घरटी नागरिक बीएसएनएलचे सीम कार्ड वापरतात. विजही गायब आणि सिमकार्डला नेटवर्क नाही, अशी अवस्था येथील नागरिकांची झाल्यामुळे ऐन दिवाळीत त्यांच्यावर शिमगा करण्याची वेळ आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करणा-या वैद्यकीय अधिका-यांना कामाच्या ठिकाणी राहण्याच्या सूचना केल्या जातात. त्याच धर्तीवर ठोसेघर परिसरासाठी येथे निवासी वायरमेनची नेमणूक करावी, अशी मागणी या निमित्ताने जोर धरू लागली आहे.