esakal | गंजीवर झाकण टाकण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्ञानेश्वराच्या अंगावर वीज कोसळली

बोलून बातमी शोधा

गंजीवर झाकण टाकण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्ञानेश्वराच्या अंगावर वीज कोसळली

घरात ज्ञानेश्वर हा करता असल्याने त्याचेवरच काळाने घाला घातला. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने आखेगणी गावावर शोककळा पसरली आहे.

गंजीवर झाकण टाकण्यासाठी बाहेर पडलेल्या ज्ञानेश्वराच्या अंगावर वीज कोसळली
sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : आखेगणी (ता. जावळी) येथे रविवारी मुसळधार पावसात अंगावर वीज पडून ज्ञानेश्वर गावडे (वय 35) या युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी, की आखेगणी येथे सायंकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. या वेळी विजांचा कडकडाट झाला. ज्ञानेश्वर तुकाराम गावडे हा युवक घराच्या जवळच असणारी गवताची गंज भिजू नये, म्हणून त्याच्यावर झाकण टाकण्यासाठी गेला होता. 

यावेळेस अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये तो भाजून जमिनीवर पडला. ग्रामस्थांना ही माहिती समजताच त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले; परंतु भिलार येथे गेल्यावर खासगी दवाखान्यात ज्ञानेश्वरला दाखवले असता तो मृत झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

ज्ञानेश्वर हा गरीब शेतकरी कुटुंबातील असून, वडील वृद्ध आहेत. तो स्ट्रॉबेरी शेती करून आपली उपजीविका करीत होता. या शेतीवरच त्याचे कुटुंब अवलंबून होते. घरात ज्ञानेश्वर हा करता असल्याने त्याचेवरच काळाने घाला घातला. त्याच्या दुर्दैवी मृत्यूने आखेगणी गावावर शोककळा पसरली आहे. 

भांडूपच्या बंटी बबलीचा भुईंजकरांनाही दणका 

पुढील आदेश येईपर्यंत शिरवळ शहर राहणार बंद

परजिल्ह्यातून - परराज्यातून जावळी तालुक्यात येणा-यांसाठी महत्वाची बातमी

उदयनराजेंनी भीक मांगो आंदोलनातून जमा केलेले 450 रुपये काेणत्या अधिका-याने का नाकारले, पुढे काय झाले वाचा सविस्तर

Edited By : Siddharth Latkar