
कोळकी : श्री क्षेत्र पंढरपूरहून आळंदीकडे निघालेला श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज सायंकाळी सहा वाजता फलटण येथील रविवार पेठेतील श्री संत नामदेव महाराज शिंपी समाजाच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये विसावला. सोहळ्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांनी स्वागत केले, तसेच महाराजांच्या पादुकांची सपत्निक आरती केली. या वेळी फलटण शहरासह तालुक्यातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले.