

Corporator’s Swift Action Ensures Safe Delivery for Migrant Woman
Sakal
कऱ्हाड : रोजगाराच्या शोधात येथे आलेले ते दांपत्य मूळचे उत्तर प्रदेशातील. गावाकडे घरासहीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने त्यांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागले. दांपत्य कऱ्हाडला आले खरे. मात्र, पत्नी गरोदर होती. प्रसूती कशी आणि कोठे करणार? हा खरा प्रश्न होता. कारण त्यांची सगळीच कागदपत्रे जळून खाक झाल्याने ओळख पुसली गेली होती. ओळखपत्र नसल्याने उपचारासाठी अडथळे निर्माण होत होते. अशावेळी त्यांच्या मदतीला मलकापूरचे नगरसेवक दादा शिंगण धावून आले.