
कऱ्हाड : महामार्गावर अपघात होऊन माणसं मरताहेत. उपाययोजना करण्यासाठी माणसं मरायची वाट पाहणार का? तुम्ही गांभीर्याने बघणार आहे की नाही? किती दिवस नुसती कारणे देणार? अशा प्रश्नांची सरबत्ती करून आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आठवड्यात महामार्गावर आवश्यक त्या उपाययोजना करा. अन्यथा अपघात झाल्यास संबंधित ठेकेदार कंपनीसह जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.