
कऱ्हाड : राज्यात शेतकऱ्यांनी एकत्र येत अनेक सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केल्या आहेत. त्यांना ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी व त्यांचा समावेश केंद्राच्या जलद सिंचन लाभ कार्यक्रमात करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांनी आज विधानसभेत केली.