भारत पाटणकरांची घाेषणा; ३२ आण्याचा सातबारा कुळांच्या नावे १६ आणे करुन मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन

सलाउद्दीन चाेपदार
Wednesday, 10 February 2021

दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर म्हसवड परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी कुटुंबासमवेत बेमुदत ठिय्या आंदोलनास बसणार आहेत.

म्हसवड (जि. सातारा) : म्हसवड (ता.माण ) भागातील सरंजामांचे जमिनीचे मोठ्या संख्येतील कुळधारक शेतकरी बांधवांचे कुटुंबासमवेत दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर उद्यापासून (गुरवार, ता.११) पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले जाणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ति दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. 

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी म्हसवड शहरसह परिसरातील वाड्या रस्त्यावरील शेतकरी बांधवांच्या गेल्या तीन चार दिवसांपासून नियमित बैठका होत असुन सुमारे शंभर टक्के जमिन कुळधारक शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्यामुळे हे आंदोलन शेतकरी बांधवांच्या संख्येने ऐतिहासिक असे निश्चितच ठरेल.

सातबारा कोरा करून कुळधारक मालक घोषित करेपर्यंत आंदोलन; डॉ. भारत पाटणकरांचा निर्धार

जोपर्यंत सरकार येथील सरंमजामांची प्रत्येक सातबारा उता-यावर नोंदी करून बोगस रित्या ठेवलेली नावे काढून टाकून प्रत्येक सातबारा कोरा करुन आमचीच नावे असलेला दुरुस्त करुन हाती दिला जात नाही तो पर्यंत दहिवडी येथील प्रांत कार्यालयासमोर ठिय्या माडूंन आम्ही बसलेले सर्वजण उठणारच नाही असा ठाम निर्धार येथील शेतकरी बांधवांनी आंदोलन पुर्व तयारीच्या ठिकठिकाणच्या बैठकित करीत आहेत.

'शिवेंद्रसिंहराजे कधीही कुणाच्या नादाला लागत नाहीत, लागलेच तर त्याचा नाद संपवल्याशिवाय गप्प बसत नाहीत'

बाळूपाटलाच्या वाडीतील युवकाचा मारहाणीत मृत्यू

दिल्लीच्या जेएनयूचे नाव स्वामी विवेकानंद विद्यापीठ होणार?; केंद्रीय शिक्षणमंत्री निशंक यांची लोकसभेत माहिती

खुशखबर! UPSC उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी; केंद्र सरकारचा परीक्षार्थींना मोठा दिलासा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr bharat patankar decleares protest in mashwad satara marathi news