Direction Committee : 'डॉ. महेश गुरव यांची दिशा समितीवर निवड'; खासदार उदयनराजे भोसले यांनी केले अभिनंदन
Recognition for Public Work: केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, हे कमिटीचे प्रमुख काम आहे. जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, मनरेगा, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, शिक्षण, आरोग्य आदी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी या समितीच्या माध्यमातून केली जाते.
Dr. Mahesh Gurav receives appointment to the prestigious DISHA Committee; MP Udayanraje Bhosale extends his heartfelt congratulations.Sakal
वडूज: येथील नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव यांची जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.