सातारा : ‘एक देश, एक निवडणूक’ आणण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव अव्यवहार्य व लोकशाही व्यवस्थेला मारक आहे. त्यास विरोध केला पाहिजे, असे मत संविधानाचे अभ्यासक डॉ. नितीश नवसागरे यांनी व्यक्त केले. .Soybean News : सोयाबीनच्या दरवाढीला पुन्हा गुंगारा; शासकीय हमीभाव केंद्रातील कमी दरामुळे शेतकऱ्यांत संभ्रम.भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने पाठक हॉलमध्ये सुरू असलेल्या ३८ व्या थोरांच्या स्मृती व्याख्यानमालेत ‘एक देश, एक निवडणूक व संविधान’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे होते. कार्यक्रमास उपाध्यक्ष रमेश इंजे व विश्वस्त यशपाल बनसोडे उपस्थित होते..डॉ. नितीश नवसागरे म्हणाले, ‘‘भारतीय संविधान जगातील सर्वोत्तम आहे. त्यामुळेच गेल्या पन्नास वर्षांत आपला देश एकसंध राहिलेला आहे. ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पना अस्तित्वात आणण्यामध्ये अनेक संविधानिक धोके आहेत. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या घटना दुरुस्तीमुळे संविधानाचा आशय बदलतो का हे तपासून बघावे लागेल. या घटना दुरुस्तीसाठी संसदेमध्ये दोन तृतीयांश बहुमत व देशातील पन्नास टक्के राज्यांची संमती आवश्यक आहे. देशात एकाच वेळी निवडणुका घेण्यामुळे खर्च वाचेल हे कारण गैर लागू आहे. देशाचे एकूण बजेटमध्ये हा खर्च नगण्य आहे.’’.लोकशाही टिकवण्यासाठी ही किंमत मोजावी लागेल. हुकूमशाहीत तर निवडणुका होण्याची शक्यता नसल्याने हा सगळाच खर्च वाचेल. राज्यकर्त्यावर अंकुश ठेवण्यासाठी लोकशाहीत निवडणूक आवश्यक आहेत. त्यासाठी आर्थिक कारण देणे चांगले नाही व हे लोकशाहीला पोषकही नाही. निवडणूक आचारसंहितेमुळे विकासकामांत अडथळा येतो हे म्हणणेही खरं नाही. संपूर्ण देशासाठी एकच मतदार यादी प्रस्तावित आहे. हे देखील योग्य नाही. संपूर्ण देशाच्या केंद्रीय प्रश्नांवर निवडणुकीत चर्चा होणार असल्याने स्थानिक जीवन मरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होऊन ते बाजूला पडण्याची भीती आहे. संघराज्याचे वैविध्यपूर्ण गोष्टींना सामावून घेणारे सर्व समावेशक वैशिष्ट्य टिकून ठेवणे गरजेचे आहे. असे असताना एक देश एक निवडणुकीचा अट्टाहास करणे योग्य नाही, असेही नवसागरे यांनी सांगितले..Educational News : विद्यार्थ्यांची कलचाचणी चार वर्षांपासून बंद, पालकांसमोर अडचणी.रमेश इंजे यांनी प्रास्ताविक केले. यशपाल बनसोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संबोधी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विचारवंत किशोर बेडकीहाळ, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.