Dr. Sandip Yadav
sakal
- सचिन शिंदे
कऱ्हाड - एका ऑपरेशन थिएटरबाहेर असहायपणे उभा असलेला नातू... आत मृत्यूशी झुंज देणारी आजी... त्याचवेळी रक्ताच्या एका पिशवीसाठी सुरू असलेली धावपळ... २० वर्षांपूर्वी घेतलेल्या या अनुभवातून त्याच नातवाने अन्य सामान्य रुग्णांना रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी कऱ्हाडला अद्ययावत रक्तपेढीच उभी केली अन् गेल्या १५ वर्षांत याच रक्तपेढीने लाखभर रुग्णांना जीवनदान दिले.