

Employment Scam Rocks Satara: Seven Youth Fall Prey
sakal
दुधेबावी: फलटण तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकारच्या ''इन्कम टॅक्स'' विभागात ''टॅक्स असिस्टंट'' या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका सराईत भामट्याने सात तरुणांना ४८ लाख ५० हजारांचा गंडा घातला आहे.