

Six Held, ₹55 Crore Narcotics Recovered in Massive DRI Crackdown
Sakal
कऱ्हाड : पाचुपतेवाडी-तुळसण ‘ऑपरेशन सह्याद्री चेकमेट’ नावाने गुप्तचर संचालनालयाच्या खात्याने टाकलेल्या छाप्यात सुमारे ५५ कोटींचे ड्रग्ज जप्त केले. पोल्ट्रीच्या नावाखाली सुरू असलेल्या ड्रग्ज उत्पादन करणारा फिरता कारखाना डीआरआयने स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने उद्ध्वस्त केला. डीआरआय विभागाने पत्रकाद्वारे त्याबाबतची माहिती दिली. या छाप्यात द्रव्य व पावडर स्वरूपात ड्रग्ज जप्त करण्यात आले. द्रव्य व पावडर असे २१ किलो ९१२ ग्रॅम एमडी म्हणजे मेफेड्रोन जप्त केले असून, त्याची सुमारे ५५ कोटी किंमत होत असल्याचे संबंधित विभागाने स्पष्ट केले.