
कऱ्हाडला वीज कंपनीच्या कार्यालयासमोर वाजविला ढोल-ताशा
कऱ्हाड : पाडळी (ता. कऱ्हाड) येथील घरांवरून गेलेल्या वीज वाहक तारा हटविण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज मुंढे येथील वीज कंपनीच्या येथील कार्यालयासमोर भीम आर्मी संघटनेतर्फे ढोल ताशा वाजवून अनोखे आंदोलन केले. भीम आर्मीचे जावेद नायकवडी यांच्या नेतॉत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत निषेध नोंदवला. भीम आर्मीने निदर्शने तारा न हटविल्यास पुढे तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा दिला आहे.
तालुक्यातील पाडणी येथील इंदिरानगरमध्ये राहत्या घरांवरुन विजवाहक तारा गेल्या आहेत. त्या तारा चार ठीकाणी जोडलेल्या आहेत. त्या तारा चार ठीकाणी जोडल्याने अनेकवेळा जोड निघुन तार घरांवर पडत आहेत. त्याचा धोका तेथील रहवाशांना आहे त्या धोकादायक तारा दुरुस्त कराव्यात, अशी तक्रारी वारंवारा करुनही दखल न घेतल्याने आज आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला.. मंढे येथील वीज कंपनीच्या कार्यालयाबाहेर आज भीमआर्मीतर्फे आंदोलन केले. उपअभियंता श्री. जाधव यांना निवेदन देवुन त्या मागण्यांकेड लक्ष वेधण्याचे आवाहन करण्यात आले. भीमआर्मीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद नायकवडी, जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, पाटण तालुका संघटक फिरोज मुल्ला, कार्याध्यक्ष प्रविण सावंत, इरफान मुल्ला, सरफराज मुल्ला, संजय पाटोळे व पाडळीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Web Title: Drums Beat Front Power Company Office Unique Agitation Attention Demand Removal Power Lines Passing Through Houses
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..