मुसळधारेने संसार उघड्यावर! साताऱ्यात 1320 कुटुंबांचे हरवले छत्र

मुसळधारेने संसार उघड्यावर! साताऱ्यात 1320 कुटुंबांचे हरवले छत्र
Updated on
Summary

आतापर्यंतच्या पंचनाम्यातून हे वास्तव समोर आले असून, भूस्खलन, पुराच्या फटक्यात उद्‌ध्वस्त झालेले संसार उभे करण्याचे आव्हान बाधितांसमोर आहे.

कऱ्हाड (सातारा): आयुष्याची पुंजी खर्च करून काडीकाडी जमा करत उभारलेले कुडामेडाचे घर, कर्ज काढून त्याची केलेली डागडुजी, काहींची वडिलार्जित घरे पुराच्या, भूस्खलनाच्या फटक्यात मोडून पडली. पाटण, महाबळेश्वर, वाई, जावळी, कऱ्हाड, सातारा तालुक्यांतील एक हजार ३२० कच्ची-पक्की घरे मोडली आहेत. आतापर्यंतच्या पंचनाम्यातून हे वास्तव समोर आले असून, भूस्खलन, पुराच्या फटक्यात उद्‌ध्वस्त झालेले संसार उभे करण्याचे आव्हान बाधितांसमोर आहे.

मुसळधारेने संसार उघड्यावर! साताऱ्यात 1320 कुटुंबांचे हरवले छत्र
..तर सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरं महापुरात तरंगली असती!

पूर व भूस्खलनात जी घरे शाबूत आहेत ती राहण्यायोग्य आहेत की नाही याचीही शंका आहे. त्यामुळे अनेकांच्या घराकडे जाण्यासाठी अंगावर काटा येत आहे, अशी स्थिती आहे. अनेक दिवस जुनी मातीची, कुडामेडाची आणि चांगली घरेही पाण्यात राहिल्याने त्या घरांना धोका निर्माण झाला आहे. अनेक घर डोळ्यादेखत कोसळत आहेत. अनेक जुन्या मातीच्या घरांच्या भिंती कोसळून नुकसान होत आहे, तर अनेकांची घरे कधी कोसळतील याचा नेम राहिलेला नाही.

मुसळधारेने संसार उघड्यावर! साताऱ्यात 1320 कुटुंबांचे हरवले छत्र
Rain Alert : पुणे, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा

पूरग्रस्त गावात रोज दोन- चार घरे कोसळत आहेत. त्यामुळे मातीच्या घरात राहूच शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. तीच स्थिती कुडामेडांच्याही घरांची झाली आहे. काही गावांत तर पत्र्यासकट छत वाहून गेले आहेत. त्यामुळे तेथील लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, ते निवारा शोधत आहेत. काहींनी तर सामाजिक सभागृह, मंदिरांत आसरा घेतला आहे. ती घरे उभी करण्याचे आव्हानच संबंधित पूरग्रस्तांसमोर आहे.

मुसळधारेने संसार उघड्यावर! साताऱ्यात 1320 कुटुंबांचे हरवले छत्र
मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द; उद्धव ठाकरे पुण्याकडे रिटर्न

अशी आहे स्थिती

जिल्ह्याला आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांत पाटण, वाई, महाबळेश्वर, सातारा, कऱ्हाड, तालुक्यांतील गावांमध्ये जास्त नुकसान झाले आहे. त्यात पाटण तालुक्यातील ५७९, महाबळेश्वर ९६, वाई १६२, जावळी ७७, कऱ्हाड ३२१ व सातारा तालुक्यातील ८५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही नुकसानीचे पंचनामे सुरू असून, पडलेल्या घरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

मुसळधारेने संसार उघड्यावर! साताऱ्यात 1320 कुटुंबांचे हरवले छत्र
सातारा जिल्ह्यातील भूस्खलनाच्या सावटाखाली 50 गावे

दानशूरांना साद

महापुराने बाधित झालेल्या घरांच्या पडझडीचे व पूर्णतः नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्यांचे काम गावोगावी सुरू आहे. त्यामध्ये बाधित घरांची संख्या वाढणार आहे. संबंधित घरांचा लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तो खर्च करायचा कोठून हा प्रश्न सध्या पूरग्रस्तांसमोर आहे. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीत घर उभारता येत नाही हे सर्वज्ञात आहे. मात्र, त्या तुलनेत खर्च लाखांच्या घरात आहे. त्यामुळे समाजातील दानशूरांना संबंधित पूरग्रस्तांना घर उभारणीत मदत करण्यासाठी ही एक सादच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com