
-हेमंत पवार
कऱ्हाड: बोगस, दुबार मतदान नोंदणीच्या विषयाने तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यावरून भाजप आणि कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजप आणि कॉँग्रेसकडूनही मतदार यादीतील दुबार नावांचा आरोप केला जात असल्याने नेमकी ही दुबार नावे वाढवली तरी कोणी? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. मात्र, ज्यांच्याबाबत दुबार मतदारांचा आरोप केला जात आहे ते मात्र या सर्वांपासून नामानिराळेच राहिले आहेत. संबंधितावर प्रशासनाकडून काय कार्यवाही करण्यात येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.