Karad Fire Accident: पुणे- बंगळूर महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावर ई-बाईक खाक; चालक दुचाकी रस्त्याकडेला लावून दूर
Pune Bangalore Highway Incident: पुणे- बंगळूर महामार्गावर एक जण इलेक्ट्रिक दुचाकीवरून कोल्हापूर बाजूकडून कऱ्हाडच्या दिशेने जात होता. दुपारी दोनच्या सुमारास येथील शिवछावा चौकानजीक दुचाकीतून धूर येऊ लागला.
E-bike catches fire at Dhebewadi flyover on Pune-Bangalore highway; rider escapes by moving bike away from the roadSakal
मलकापूर : पुणे- बंगळूर महामार्गावरील ढेबेवाडी फाट्यालगत इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतल्याची घटना आज दुपारी घडली. त्यात इलेक्ट्रिक मोटारसायकल जळून खाक झाली. या प्रकारामुळे भर चौकात द बर्निंग बाईकचा थरार अनुभवायला मिळाला.