सातारा : डाळिंबाच्या ५५० झाडांतून ४५ लाखांची कमाई!

मार्डीच्या यशवंतराव पोळ यांनी दर तफावतेमुळे माल दिला स्थानिक बाजारपेठेत
Pomegranate
Pomegranatesakal

बिजवडी : कष्ट, जिद्द, चिकाटीच्या जोरावर दुष्काळाचे चटके सहन करूनही आज माणचा (man village)शेतकरी बागायती भागांना लाजवेल अशी शेतीतून(farming) प्रगती करत आहे. त्याचेच ज्वलंत उदाहरण मार्डी (ता. माण) येथील यशवंतराव पांडुरंग पोळ या शेतकऱ्याचे आहे. त्यांनी यावर्षी दोन एकरांत डाळिंबीच्या(Pomegranate) केवळ ५५० झाडांतून २८ टन माल काढत ४५ लाख रुपयांवर कमाई करून दाखवली आहे.आज अनेक शेतकरी डाळिंबीतून पैसा मिळतोय म्हणून फळबाग लावताना दिसून येतात. मात्र, फळबागेकडे पोटच्या पोरांएवढे लक्ष द्यावे लागते, हे ज्या शेतकऱ्यांना कळते, तोच शेतकरी डाळिंबीत यशस्वी झाल्याचे दिसते. अन्यथा तेल्या, मररोगामुळे काही दिवसांत अनेकांच्या बागा बांधावर काढून टाकाव्या लागल्यात. मार्डीचे यशवंतराव पोळ हे डाळिंब शेतीचा परिपूर्ण अभ्यास करत फळबागेची जोपासना करत आहेत. त्यांच्या बागेवर तेल्याने आक्रमण केले होते. परंतु, हताश न होता त्यांनी झाडांना ताकद देत पुन्हा उभारी घेतली. आज ते प्रत्येकवर्षी लाखो रुपये कमावत आहेत.

Pomegranate
मुंबई - गोवा महामार्गावर लागल्या वाहनांच्या रांगा

माण तालुक्यात डाळिंबीचे क्षेत्र भरपूर असून, मार्गदर्शनाअभावी शेतकऱ्यांना डाळिंबीचे पैसे करता येत नाहीत. आपण डाळिंब तज्‍ज्ञ भागवत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डाळिंब निर्यात करण्यासाठी ‘रेस्युड्यु फ्री’ डाळिंबासाठी प्रशिक्षण घेतले आहे. मार्डीतील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन गेले तीन वर्षे आम्ही डाळिंब निर्यात करत आहोत. माणमधील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनाही डाळिंब निर्यातीसाठी मार्गदर्शन करणार आहे.

- यशवंतराव पोळ, शेतकरी, मार्डी, ता. माण

जागेवर ५० ते ६० रुपयांनी जाणाऱ्या आमच्या डाळिंबाला यशवंतराव पोळ यांच्यामुळे निर्यात होऊन १६० च्या वर दर मिळाला. ‘रेस्युड्यू फ्री’साठी थोडा खर्च वाढत असला तरी निर्यातीच्या डाळिंबाला दरही चांगला मिळतो.

- धनाजी पोळ, शेतकरी, मार्डी, ता. माण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com