कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला I Koyna Dam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake in Koyna Dam

कोयना धरण परिसर आज भूकंपाच्या धक्क्यानं हादरला आहे.

कोयना धरण परिसर भूकंपाच्या धक्क्यानं हादरला

कोयनानगर : कोयना धरण (Koyna Dam) परिसर आज (शनिवार) दुपारी भूकंपाच्या (Earthquake in Koyna Dam) सौम्य धक्क्यानं हादरला. शनिवारी दुपारी २.१४ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का या परिसरात बसला आहे. भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.९ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत्येस ६ किमी अंतरावर आहे.

हेही वाचा: मुस्लिमांच्या वाईट स्थितीला जबाबदार कोण?

८ जानेवारीला दुपारी २.१४ ला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता २.९ रिश्टर स्केल एवढी होती, तर भूकंपाच्या धक्क्याची खोली ४ होती. या भूकंपाच्या धक्क्याच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून जवळच हेळवाक गावाच्या नैऋत्येस ६ किमी होते. हा धक्का कोयना परिसरात जाणवला आहे. या धक्क्यामुळे पाटण तालुक्यात कुठेही हानी झाली नसल्याचे तहसीलदार रमेश पाटील (Tehsildar Ramesh Patil) यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top